संगमनेर : वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे तर महाविकास आघाडीचीच सर्वत्र हवा आहे. जन कल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत. अमृता लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार…
Read MoreDay: April 11, 2024
मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता काॅग्रेस पक्ष गहाण ठेवला : राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर :; मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काॅग्रेस मधील काही नेते स्वताचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बोलण्याचा रोख माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे होता. ज्या ठिकाणी पक्षाचे प्राबल्य आहे अशा जागा सोडून द्यायचा स्वताच्या फायद्यासाठी नको तिथे उमेदवार देण्याचे काम राज्यातील काॅग्रेसी नेत्यांनी केले असल्याकडे लक्ष वेधून, बाळासाहेब थोरात स्वताला जेष्ठ नेते समजतात पण थोरातांची…
Read More