सुसंस्कृत नेतृत्व –  आमदार बाळासाहेब थोरात

सुसंस्कृत नेतृत्व –  आमदार बाळासाहेब थोरात

राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील  सुसंस्कृत  राजकारण्यांपैकी एक आहे, अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाचे नेते  म्हणून, ते राज्यात सर्वपरिचित आहे. विकास कामे करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

 ते प्रतिनिधित्व करत असलेला संगमनेर तालुका हा  शैक्षणिक प्रगतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच संगमनेर शैक्षणिक नगरी म्हणून  ओळखली जाते. यावरूनच आ .थोरात यांच्या विकासाची गरुड भरारी किती मोठी आहे हे दिसून येत आहे. आमदार थोरात यांचे वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यार्थिदशेत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात असत त्यामुळे देशभक्ती च्या वातावरणात भारावून जाऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली.

 म्हणून आंदोलनातले त्यांचे काही सहकारी कम्युनिस्ट विचाराचे होते. त्यामुळे अर्थातच समाजवादी कम्युनिस्ट विचारांचा पगडा त्यांच्यावर होणं स्वाभाविक होतं. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 1978 मध्ये स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे आमदार झाले. शेवटच्या माणसाच्या विकासासाठी काम करत राहणं ही विचारांची शिदोरी आमदार बाळासाहेब थोरात यांना वडिलांकडूनच मिळाली आणि त्यांनी आजही ते समर्थपणे चालवित.

शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांना बरोबर घेऊन राजकारण करण्याच्या शैलीमुळे यांचे राजकारण, सत्ताकारण ,लोकहिताचे राहिले. यामुळे संगमनेर तालुक्यातील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांच्या प्रगतीचा आलेख पाहिला तर तो कायमच उंच गेला आहे. मतदार संघाचे सलग 8 वेळा  प्रतिनिधित्व करण्याचे रेकॉर्ड  त्यांच्या नावावर आहे. नामदार बाळासाहेब थोरात हे अत्यंत कमी वयात आमदार झाले 20 वर्षे अनेक महत्वाची मंत्रीपदे साहेबांनी भूषवली. मुख्यमंत्री विलासराव देशमुख ,सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते.

महाराष्ट विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचे स्व. गणपतराव देशमुख प्रदीर्घकाळ 50 वर्षे आमदार होते. त्यानंतर हा मान आपल्या साहेबांना मिळाला. यश नेहमीं आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाट्याला आले. पाटबंधारे मंत्री ,कृषी मंत्री, पशुसंवर्धन मंत्री ,शालेय शिक्षण मंत्री, खार जमीन मंत्री ,महसूलमंत्री अशा अनेक महत्त्वाची राज्याची खाती त्यांनी समर्थपणे सांभाळली. आ. थोरात हे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्यावर अनेक जबाबदार्‍या पक्षनेतृत्वाने टाकल्या आहेत. आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागील काळात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती तसेच गुजरात विधानसभा निवडणूकीत त्यांनी पक्षाचे प्रभारी म्हणूनहि त्यांनी काम पहिले होते

आमदार बाळासाहेब थोरात यांची राजकारणाची शैली व संयमी व समन्वयाची भूमिका कायमच राहिली नामदार थोरात साहेबांनी कधीच गटातटाचे राजकारण केले नाही, त्यापासून नेहमी लांबच राहतात. त्यांचा स्वभाव मावळ आहे. यामुळे राजकारणात त्यांना कोणी शत्रू नाही शिवाय ते विरोधकांच्या रडारवर ही कधीच नसतात. संगमनेरात गमतीने असं म्हणतात की, आ  थोरात यांचा राजकारणात कोणी विरोधक नाही, संगमनेरात विरोधी पक्षच नाही एक पक्ष आहे तो म्हणजे बाळासाहेब थोरात. साहेबांनी संगमनेर तालुक्यात सर्व जाती धर्मांना सत्तेत वाटा मिळवून दिला. संगमनेर तालुक्यात जिल्हा स्तरावर महिला बालकल्याण समितीचे सभापती तसेच पंचायत समिती सभापती यामध्ये महिलांना स्थान दिले.

  संगमनेर तालुक्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना त्यांनी सहकारी संस्थांमध्ये मोठी पद तसेच पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद संगमनेर नगर परिषद या स्थानिक स्वराय संस्थांमध्ये आदरणीय साहेबांनी विविध जातींचा समावेश करून त्या गटांना प्रतिनिधित्व दिलं त्यांचा स्वभाव नेहमीच सर्वांना समान व बरोबर घेऊन त्यांना सत्ते मध्ये सहभागी करून घेण्याचाच होता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्वप्नातील निळवंडे धरण त्यांनी अतिशय मोठ्या खुबीने उभे केले आणि प्रत्यक्षात ते स्वप्न साकार झाले.

कायम शेवटच्या घटकांपर्यंत अर्थात शेतकर्‍यांना पाणी मिळाले पाहिजे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने त्यांनी निळवंडे धरण हा आपला जीव की प्राण हा विषय म्हणून अगदी तन-मन-धनाने यामध्ये रस घेतला. अखेर न होणारे निळवंडे धरण साहेबांनी करून दाखवले.

Related posts

Leave a Comment