ओबीसीचे संरक्षण करु, नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्रे ः देवेंद्र फडणवीस

ओबीसीचे संरक्षण करु, नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्रे ः देवेंद्र फडणवीस

मुंबई ः काही झालं तरी ओबीसी अन्याय होऊ देणार नाही. ज्यांची नोंद आहे त्यांनाच प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. ओबीसीचे संरक्षण करावेच लागेल. गरज पडली तर मी माझ्या वरिष्ठांशी बोलणार आहे. त्यामुळे ओबीसीने घाबरण्याचे कारण नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न Maratha Reservation चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून सरकारने त्यांच्यासह अंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश मिळवले. सरकारने कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतचा अध्यादेश काढून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांग पाटील Manoj Jarange Patil यांना देऊन अंदोलन थांबवले. आता त्यावरुनच ओबीसी समाजाचे नेते अक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर Minister Chhagan Bhujbal, MLA Ram Shinde, Gopichand Padalkar यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी त्याबाबत आज (सोमवारी) स्पष्टीकरण दिले. फडणवीस म्हणाले, काही झालं तरी ओबीसी अन्याय होऊ देणार नाही. ज्यांची नोंद आहे त्यांनाच प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. ओबीसीचे संरक्षण करावेच लागेल. गरज पडली तर मी माझ्या वरिष्ठांशी बोलणार आहे. त्यामुळे ओबीसीने घाबरण्याचे कारण नाही.

Related posts

Leave a Comment