उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश… दादा पाणी प्या… उपचार घ्या

उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश… दादा पाणी प्या… उपचार घ्या

आंतरवली सराटीतून…

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कठोर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी आज गुरूवारी येथे बाहेर गावावरून आलेल्या महिलांनी आक्रोश केला. उपोषण सुरू करून सहा दिवस झाले. तरीही सरकार उपोषणाकडे लक्ष देत नाही आणि मनोज जरांगे पाटील उपचार, पाणी घेत नाहीत, यामुळे त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवली आहे.

The women who came out of the village cried out at the place of fast of Manoj Jarange Patil, who was on a strict fast on the issue of Maratha reservation, today on Thursday. It has been six days since the fast started. Still the government is not paying attention to the hunger strike and Manoj Jarange Patil is not taking treatment, water due to which his condition has deteriorated to a great extent.

महिलांचा आक्रोश सुरू होता, त्यावेळी क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासह बंकट स्वामी संस्थांनचे लक्ष्मण महाराज मेंगडे व इतर साधुसंत उपस्थित होते. महाराज व लोकांच्या अक्रोशानंतर मनोज मनोज पाटील यांनी घोटभर पाणी घेतले मात्र त्यांची प्रकृती प्रचंड खालवलेली आहे. त्यांना उठून बसता येत नसल्याने शरीरात कुठलाही त्रास राहिला नाही हे स्पष्ट जाणवत होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे तिसऱ्यांदा उपोषण करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या उपोषण सुरु करून सहा दिवस झाले आहेत, अजूनही शासनाचा कोणताही प्रतिनिधी उपोषणाकडे आलेला नाही. त्यामुळे शासन जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करून मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सहा दिवसापासून शरीरात पाणी नसल्याने त्यांच्या शरीरात काहीही त्राण राहिला नाही. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी विनंती केल्यावर काल मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले होते. पण पुन्हा उपचार बंद केले.

आज गुरूवारी पुन्हा दुपारी शिवाजी महाराज, बंकटस्वामी संस्थानचे मेंगडे महाराज यांनी अंतरवली सराटी येथे उपोषणस्थळी भेट देऊन पाटील यांना पाणी घेण्याची विनंती केली. याशिवाय या ठिकाणी उपस्थित असलेल्या हजारो महिला, नागरिकांनी उपचार घ्या…पाणी प्या असा आक्रोश केला. लोकांच्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील यांनी केवळ दोन घोट पाणी घेतले. मात्र आता केवळ दोन घोट पाण्यावर नव्हे तर प्रत्यक्ष उपचाराचीच नितांत गरज असल्याची भावना या ठिकाणी अनेक लोकांनी व्यक्त केली.

Today Thursday afternoon again Shivaji Maharaj, Mengde Maharaj of Bankatswami Sansthan visited the hunger strike at Antarvali Sarati and requested Patil to take water. Apart from this, thousands of women and citizens who were present at this place shouted that get treatment…drink water. Jarange Patil took only two sips of water, complying with the people’s request

शासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. शासन, लोकप्रतिनिधी व मराठा समाजाचे आमदार यांना शिव्याची लाखोली वाहत आहेत. दिवसभर या भागात वाहणे लावायला ही जागा मिळत नाही एवढी प्रचंड गर्दी होत आहे परंतु रात्रीही लोकांची येथे येणारयाची रीघ लागली आहे. हजारो मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत ठाण मांडले आहे संपूर्ण रात्रभर येथे हजारो मराठा बांधव बसून राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो मराठा तरुण कार्यकर्ते महिला नागरिक शेतकरी अंतरवली सराटीकडे धाव घेत असून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे दिवसभर या भागात वाहणे लावायला ही जागा मिळत नाही एवढी प्रचंड गर्दी होत आहे परंतु रात्रीही लोकांची येथे येणारयाची रीघ लागली आहे. हजारो मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत ठाण मांडले आहे संपूर्ण रात्रभर येथे हजारो मराठा बांधव बसून राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. As Manoj Jarange Patil’s health deteriorates, thousands of Maratha youth activists, women citizens, farmers are rushing to Antarwali Sarati in Maharashtra and there is a large crowd here

Related posts

Leave a Comment