आंतरवली सराटी (जि. जालना) ः मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय रद्द झाला म्हणजे माघार घेतली नाही. मराठा आरक्षणाला विरोध कऱणाऱ्यांना आपले उमेदवार निवडून आणून धडा शिकवण्याचा विचार होता. नाही जमलं, आता उमेदवार पाडून धडा शिकवू. जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्याला समर्थन करतील, भविष्यात त्यावर काम करेल असे लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु. अगदी भाजपच्या उमेदवारांनी जरी लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु असे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
We will support, write and video support Maratha reservation. Manoj Jarange Patil, the leader of the Maratha reservation struggle, said that even BJP candidates would write and make videos to help them.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिड वर्षापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीत मराठा, मुस्लीम, दलित (एमएमडी) ची मोट बांधून मराठा, मुस्लीम, दलित समाजाची ताकद असलेल्या विधानसभा मतदार संघात या निवडणूकीत काही जागा लढवण्याचा निर्णय़ घेतला होता. अगदी त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. रविवारी सायंकाळी काही मतदार संघाची नावेही जाहीर केली. मात्र सोमवारी सकाळी अचानक हा निर्णय़ रद्द केला. कोणत्याही मतदार संघात उमेदवार उभे करायचे नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणाला विरोध कऱणाऱ्यांना आपले उमेदवार निवडून आणून धडा शिकवण्याचा विचार होता. नाही जमलं, आता उमेदवार पाडून धडा शिकवू. जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्याला समर्थन करतील, भविष्यात त्यावर काम करेल असे लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु. अगदी भाजपच्या उमेदवारांनी जरी लिहून दिले आणि व्हिडीओ करुन देतील त्यांना मदत करु असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोणाला पाडणार आणि कोणाला निवडून आणणार याची धास्ती अनेक उमेदवारांनी घेतली आहे. आता जरांगे पाटील यांची पुढील भूमिका काय असेल आणि किती उमेदवार मराठा समाजाच्या आरक्षणाला लेखी समर्थन करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांत याबाबत धास्ती आहे.1
हा तर गनिमी कावा….
मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणूकीतून माघार घेतल्याची टिका लोकांकडून होत आहे तर काही नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या या निर्णय़ाच्या स्वागत केले आहे. मराठा समाज आरक्षण लढ्यात काम करणाऱ्यांसह विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्यांनीही जरांगे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मराठा समाजाचे उमेदवार उभे केले तर मताची विभागणी होईल आणि नको तेथे मराठा समाजाला विरोध असणारे लोक निवडून येतील असे सांगत जरांगे पाटील यांचा हा गनिमा कावा असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.