कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांचा रविवारी कृषीमधील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्काराने गौरव

कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांचा रविवारी कृषीमधील सर्वोच्च कृषीरत्न पुरस्काराने गौरव

अहमदनगर, ः कांदा बिजोत्पादनासह शेतीविकासासाठी पंचवीस वर्षापासून योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कृषीरत्न या कृषीमधील सर्वोच्च पुरस्काराने रविवारी (दि. २९ सप्टेंबर) मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते दौलावडगाव (ता. आष्टी) येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे (अण्णा) यांचा सन्मान केला केला जाणार आहे. Governor C in Mumbai. P. Radhakrishnan, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar will honor the progressive and experimental farmer Krishibhushan Babasaheb Pisore (Anna) of Daulavadgaon (Ashti).

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता महिला कृषीभूषण, सेंद्रिय शेती कृषीभूषण, शेतीमित्र, शेतीनिष्ठ शेतकरी तसेच पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील सेवारत्न पुरस्कारांबरोबरच पीक स्पर्धा विजेत्यांना रविवारी (दि. २९) पारितोषीक वितरण होणार आहे.

कृषी विभागाकडून दरवर्षी एका शेतकऱ्याला कृषीरत्न हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. शेती आणि शेतकरी विकासात भरीव योगदान असलेल्या शेतकऱ्यांची निवड केली जाते. २०२१ च्या कृषीरत्न साठी अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या सिमेवरील दौलावडगाव (ता. आष्टी) येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांची निवड झालेली आहे. पिसोरे गेल्या पंचवीस वर्षापासून कांदा बिजोत्पादनात भरीव काम केले आहे. त्यांनी सोना ४० या कांदा बियाणांचे संशोधन केले असून कांद्याचे एकरी १० टनावरुन पंचवीस टनापर्यत उत्पादन नेले आहे.

राज्यातील आणि राज्याबाहेरील लाखो शेतकरी या बियाणांचा कांदा लागवडीसाठी वापर करतात. समाजीक कामात ते सक्रीय आहे. खासदार सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या राज्य कृषी पर्यटन संघाचे ते संचालक असून कृषी पर्यटन वाढावे यासाठीही त्यांनीही भरीव काम केले आहे. शेतीसाठी पुरक असलेल्या शेळीपालन, दौला वडगाव (ता. आष्टी) परिसरातील डोंगऱाळ भागात फळबाग लागवडीतून माळरानावर नंदनवन फुलवले. भारतीय कृषक समाजचे बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. यापर्वी शासनाने त्यांचा शेतीमधील योगदानाबद्दल कृषीभुषण पुरस्कार देऊन गौरवलेले आहे.

२०२१-२२ या वर्षासाठी बाबासाहेब पिसोरे यांची कृषी विभागाच्या सर्वोच्च कृषीरत्न पुरस्कारासाठी निवड झालेली असून रविवारी (दि. २९ सप्टेंबर) मुंबईतील वरळी येथील एन.एस.सी. आय केंद्र येथे होणाऱ्या सन्मान सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभ गौरव केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महसूलमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असतील. तीन लाख रुपये रोख, सुवर्णपदक, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या सन्मानाचे स्वरुप आहे. कृषीरत्न पुरस्काराने गौरव होत असल्याने कृषीभुषण बाबासाहेब पिसोरे यांचे बीड, नगर जिल्ह्यासह राज्यभरातून अभिनंदन होत आहे. Babasaheb Pisore has been selected for the highest Krishiratna Award of the Department of Agriculture for the year 2021-22 and will be held at NSC Worli, Mumbai on Sunday (September 29). In the honor ceremony at I Kendra, Governor C. P. Radhakrishnan will be honored.

ReplyForwardAdd reaction

Displaying 1727437921779.jpg.

Related posts

Leave a Comment