पुणे ः मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्यांचे प्रमाणपत्रे वाटप करा, सग्या सोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय असेल हे स्पष्ट करा, हीच आमची मागणी आहे. आम्हाला काय मुंबईला जायची आम्हाला हौस नाही. सरकार दुर्लक्ष करतय यांचे वाईट वाटतय, मोठा समुदाय असूनही त्यांनी दिलेला शब्द पाळत नाहीत. मात्र मी समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असे ठासून सांगत मराठ्यांना मुंबईत आडवणे एवढे सोपे नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. Clarify the definition of true grains, share certificates of 54 lakh records found Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार असून ते रॅलीने लाखो मराठा समाजाच्या लोकांबरोबर मुंबईला जात आहेत. आज (बुधवारी) पुण्यातील चंदननगर (खराडी बायपास) येथे मुक्काम ठिकाणाहून पुण्यात जाताना पत्रकारांशी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patilबोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, सरकारला सात महिने वेळ दिला. यापेक्षा कोणत्या अंदोलकांनी वेळ दिला ते सांगावे, नोंदी सापडल्या त्यासह सरकारला जी माहिती आहे,
ती लोकांना देणे क्रमप्राप्त आहे. त्याची माहिती लोकांना कळवली पाहिजे. ग्रामपंचायतला याद्या लावल्या पाहिजेत. ते सरकाचे काम आहे. ५४ लाख kunbi नोंदी सापडल्या, त्याचे प्रमाणपत्रे का दिली नाहीत. उपोषण सोडताना दिलेला शब्द पाळला पाहिजे. जर कोणी म्हणत असेल की कायदेशीर बाजून बोलत नाही, तर मग ज्यांची नोंद नाही, मागास असावे लागते. ते मागासही सिद्ध केलेले नाही तरी सरकारने आरक्षणाचा लाभ दिला. आम्ही तर मागास सिद्ध झालेलो आहोत. आमच्या सातत्याने नोंदी सापडत आहेत. तरीही आम्हाला आरक्षणाचा लाभ देत नाहीत. जे मागास सिद्ध नाहीत, नोंदी नाहीत ते कायद्याला धरुन आहे का, असा प्रश्न उपस्थित करत मराठ्याला डिवचायचा कोणी प्रयत्न करु नये.
क्युरिटीन पिटीशन Curitine Petition मधून काही मिळणार नाही. मागचे पाढे पुढे येतील. त्यापेक्षा प्रमाणपत्र द्या प्रश्न लगेच सुटू शकतो. मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करा. ओबीसीचे नेत्यांनी अजूनही साम्यज्यश्यांची भूमिका घ्यावी, गरिब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात माती कालवू नये. आमच्या वाट्याला जर कोणी गेलं, मराठा आरक्षणाला विरोध केला तर आम्ही कोणालाच सोडणार नाही. We will not spare anyone if we oppose Maratha reservation आम्हाला मुंबईला अडवणं एवढं सोपं नाही, असा प्रयोग सरकारने करु नये असा इशारा जरांगे यांनी दिला.