भुजबळ मराठा समाजाच्या अन्नात माती कालवत आहेत ः मनोज जरांगे पाटील

भुजबळ मराठा समाजाच्या अन्नात माती कालवत आहेत ः मनोज जरांगे पाटील

बीड ः कोणचं चांगले व्हायला लागलं की त्यात माती कालवायची हा त्यांचा धंदाच आहे. पण कायदा झालाय, त्यामुळे काही होणार नाही. जर सग्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याला विरोध केला, तर मंडल आयोगाला चॅलेज करणार आहे. त्यासाठी आम्ही तयारच आहोत, तुम्हाला दिलेले आरक्षण कशाचा आधारावर दिले हे सांगावे लागेल असा इशारा देत मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी भुजबळावर जोरदार टिका केली.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून सरकारने त्यांच्यासह अंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश मिळवले. सरकारनेकुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतचा अध्यादेश काढून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांग पाटील Manoj Jarange Patil
यांना देऊन अंदोलन थांबवले. आता त्यावरुनच ओबीसी समाजाचे नेते अक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर Minister Chhagan Bhujbal, MLA Ram Shinde, Gopichand Padalkar यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेतली. समाजमाध्यमावरही त्याबाबत उलटसुटल चर्चा सुरु आहे.

आंतरवली सराटीतून रायगडाकडे जाताना मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी माध्यमाशी संवाद साधला, ते म्हणाले, मराठा आरक्षणातून Maratha Reservation गरिब मराठ्यांचे कल्याण होत असताना ही काही लोकांना पाहवत नाही. मराठ्याच्या अन्नात आतापर्यत त्यांनी माती कालवण्याचेच काम केले आहे. आताही सरकारने काढलेल्या आध्यादेशाला विरोध करुन मराठ्याचे नुकसानच करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्यांनी काहीही केले तर मराठा समाजाला आरक्षणच मिळणार. अध्यादेशाला त्यांनी चॅलेंज करावे याचीच आम्ही वाट पाहत आहेत. आमच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही मंडल आयोगालाच चॅलेज करणार आहोत. तशी तयारी आम्हीही केलेली आहे. तुम्हाला कशाच्या आधारावर आरक्षण दिले हे सांगावे लागेल.

Related posts

Leave a Comment