माळसिरस जि. सोलापूर : -काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेत्यांकडून आतापर्यंत फक्त गरिबी हटविण्याचा नारा दिला गेला. मात्र, प्रत्यक्षात ती हटविण्यासाठी काहीचे केले जात नव्हते. आम्ही गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. काँग्रेसच्या काळात साठ वर्षे सत्ता असूनही शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. आम्ही मात्र सिंचनाच्या अनेक योजना वेगाने पूर्ण करत आहोत असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
Inspite of 60 years of power during the Congress period, water did not reach agriculture. However, Prime Minister Narendra Modi attacked senior leader Sharad Pawar along with the Congress party saying that we are completing many irrigation schemes at a fast pace
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसला जनतेने ६० वर्षे राज्य करण्याची संधी दिली. मात्र, काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचवू शकली नाही. सिंचनाच्या जवळपास १०० योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यातील २६ योजना महाराष्ट्रातील होत्या. एवढा मोठा धोका काँग्रेसने महाराष्ट्राला दिला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.३०) माळशिरस येथील जाहीर सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. आता अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकद लावली आहे. आतापर्यंत ६३ योजना पूर्ण केल्या आहेत, असेही मोदी यांनी नमूद केले.Prime Minister Narendra Modi held a meeting today at Malshiras in Solapur district to campaign for the grand alliance candidate. Deputy Chief Minister Devendra Fadwanis along with key office bearers were present.
काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेत्यांकडून आतापर्यंत फक्त गरिबी हटविण्याचा नारा दिला गेला. मात्र, प्रत्यक्षात ती हटविण्यासाठी काहीचे केले जात नव्हते. आम्ही गेल्या दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. सहकार आणि साखर उद्योग ही तर महाराष्ट्राची ओळख आहे. सहकाराची साखळी आणखी मजबूत कऱण्याचा आमचा प्रयत्न आहे. सहकाराचे महत्व ओळखीने आम्ही सहकार विभागाचे स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरु केलं,
एक मोठा नेता १५ वर्षांपूर्वी माढ्यात निवडणूक लढविण्यासाठी आला होता. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी माढा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी पोचविण्याची शपथ घेतली होती. देशाच्या कृषी विभागाचं त्यांनी नेतृत्व केले. पण काय दिले, या ठिकाणी साधं पाणी त्यांनी पोचवले नाही, हे लक्षात ठेवा. त्यांना आता मतदानातून शिक्षा देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. नगर जिल्ह्यातील रखडलेला निळवंडे प्रकल्प आम्ही वेगाने पूर्ण केला असे मोदी यांनी या भाषणात स्पष्ट केले.