- शेतकऱ्यांसाठी आकाशवाणीकडून भरीव योगदान, शेतकरी संशोधक आहे, त्याला अधिक बळकटी देण्यासाठी आकाशवाणी काम करत असल्याचा आनंद……मान्यवरांचे मत
अहिल्यानगर ः शेतकरी शेती करताना केवळ शेती करत नाही तर त्यातील प्रयोगशीलता त्यातून समोर येते. शेतकरी हाच खरा संशोधक आहे. वेध घेणारा आहे. आता बदलत्या स्वरुपानुसार शेती करण्याची धडपड आहे. त्यातील अभ्यासातून पुढे जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी आकाशवाणीकडून भरीव योगदान, शेतकरी संशोधक आहे, त्याला अधिक बळकटी देण्यासाठी आकाशवाणी काम करत असल्याचा आनंद आहे असे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी व्यक्त केले.
Ahilyanagar: Farmers do not just farm while farming, but their experimentation comes to the fore. Farmers are the real researchers. They are the ones who observe. Now there is a struggle to farm according to the changing nature. There is a need to move forward through studies in this regard, expressed Sudhir Shinde, Agricultural Development Officer at the Zilla Parishad.
अहिल्यानगर येथे रेडिओ किसान दिनानिमित्त रविवारी (ता. १५) कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, ‘सकाळ’ चे सहसंपादक प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रसारण केंद्रप्रमुख डॉ. सचीन सदाफळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील, दहिगावनेच्या केव्हीकेचे प्रमुख शामसुंदर कोशिक, अकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी महादेव जोगदंड, सरोज रहाणे, वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष साबळे, पांडुरंग जोशी, जयंत लाटे, संतोष मते, सोमनाथ कांडके, अंकुश जोशी, रेखा शेटे, शीतल ठोंबरे, अक्षता अन्नदाते, गौरव वने, ज्ञानेश्वर राऊत, रवींद्र दातीर, किरण जाधव, विष्णू रच्चा आदींसह शेतकरी उपस्थित होते.
A program was held on the occasion of Radio Kisan Day in Ahilyanagar on Sunday (15). Zilla Parishad Agricultural Development Officer Sudhir Shinde, Co-Editor of ‘Sakal’ Prakash Patil, Senior Journalist Sudhir Lanka, Head of Broadcasting Center of Mahatma Phule Agricultural University Dr. Sachin Sadafal, Deputy Commissioner of Animal Husbandry Dr. Umesh Patil, Head of KVK of Dahigaon Shamsundar Koshik, Program Officer of Akashvani Sudam Batule, Sub-Divisional Agriculture Officer Dattatray Damale, Taluka Agriculture Officer of Pathardi Mahadev Jogdand, Saroj Rahane, Senior Engineering Assistant Gajendra Pawar, Senior Technician Santosh Sable, Pandurang Joshi, Jayant Latte, Santosh Mate, Somnath Kandke, Ankush Joshi, Rekha Shete, Sheetal Thombre, Akshata Annadate, Gaurav Vane, Dnyaneshwar Raut, Ravindra Datir, Kiran Jadhav, Vishnu Raccha and other farmers were present.
या कार्यक्रमात बाळासाहेब गुंजाळ, सुप्रिया नवले, राजेंद्र भवर, प्रसाद खराडे, सुधाकर जावळे, नाथा देशमुख, विश्वानाथ चव्हाण, विष्णु जरे, डॉ. दत्तात्रय वणे, ‘ॲग्रोवन’ चे पत्रकार सूर्यकांत नेटके, निलेश चिपाडे, गोवर्धन खेडकर, रमांकात डेरे, संजय राऊत, घनशाम आढाव, राजेंद्र गलांडे, योगेश वाकचौरे, संदीप कासार, विकास चावरे, प्रकाश जोशी, गंगाधर औताडे, प्रविण बनकर, इक्बाल सय्यद, रविंद्र कुकुलोळ, ज्ञानेश्वर लांडगे, सुनील अलभर, रामदास कोरडे, विठ्ठलदास आसावा, प्रसाद पवार, संतोष दरेकर, कल्याणी मुरदारे, दत्तात्रय शेरकर, संकेत बटुळे, संदीप पुराणीक, सर्जेराव मरकड, अशोक बकोरे, कैलास शिंदे, अनिल देशमुख, राणी जगताप, वैशाली शेळके, योगेश लांडगे, नागेश कदम, संदीप गुंजाळ, अनिल देशपांडे, शैलेश गाडेकर, हनुमंत उबाळे, संदीप कर्डीले, काशिनाथ खरमाळे, संचीत गिरमे, बाळासाहेब कंक, यांच्यासह जिल्हाभरातील प्रयोगशील, शासनाने गौरवलेल्या शेतकऱ्यांचा आकाशवाणीतर्फे गौरव करण्यात आला.
—————
शेतीसाठी योगदान महत्वाचे मानतो ः सुदाम बटुळे
अहिल्यानगर येथील आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सुदामराव बटुळे यांनी प्रस्तावीक करुन आकाशवाणीच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, आकाशवाणीच्या माध्यमातून सरकारी योजना, शेतकऱ्यांसाठीचे उपक्रम, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे यांच्याकडून विकसीत झालेले तंत्रज्ञान यासह शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन शेतकऱ्यांनी केलेले संशोधन, उत्पादन वाढीसाठी केलेले काम याची माहिती प्राधान्यांने दिली जाते. अगदी गावखेड्याच्या काण्याकोपऱ्यात शेती तंत्रज्ञान आणि शेतकरी उपयुक्त माहीती देता येत आहे. शेतीसाठीचे योगदान आकाशवाणीत महत्वाचे समजले जात आहेत. ग्रामीण भागात किसानवाणी अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम झाला आहे.

