मिशन पन्नास लिटर मुळे महाराष्ट्रात दूधक्रांती होईल ः दलजितसिंग गिल

मिशन पन्नास लिटर मुळे महाराष्ट्रात दूधक्रांती होईल ः दलजितसिंग गिल

  • संगमनेरला दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन, दिड हजार दुध उत्पादकांचा सहभाग

अहिल्यानगर ः संगमनेरच्या राजहंस दूध संघाच्या पुढाकाराने ‘मिशन ५० लिटर’ राबवत ५० लिटर दूध देणाऱ्या क्षमतेच्या गाई निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल, असे मत पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजितसिंग गिल यांनी व्यक्त केले.

Daljit Singh Gill, President of Punjab Progressive Dairy Farmers Association expressed the opinion that the second milk revolution will take place in the state due to the production of cows capable of giving 50 liters of milk by implementing 'Mission 50 Litre' at the initiative of Rajhans Dudh Sangh of Sangamner.

संगमनेरच्या राजहंस दूध संघाकडून दूध उत्पादन वाढीसाठी मिशन ५० अभियान अंतर्गत संगमनेर येथे कार्यशाळा झाली. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राजहंस दूध संघ व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजितसिंग गिल, खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, डॉ. जयश्री थोरात, संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर आदी उपस्थित होते.

गिल म्हणाले, पंजाब हे राज्य कृषी व दूध उत्पादनामध्ये देशात अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रामध्ये पंजाबने केलेले संशोधन हे संपूर्ण देशामध्ये जात आहे. रणजितसिंह देशमुख पंधरा वर्षापासून पंजाबमधील दूध उत्पादकांच्या संपर्कात आहेत. त्यातूनच एमडीएफ गोठा, मुरघास या संकल्पना महाराष्ट्रात राबवल्या. आगामी काळामध्ये पन्नास लिटर दूध निर्मिती हे मिशन घेऊन संगमनेर मधून काम सुरू झाले आहे. हे मिशन महाराष्ट्रासाठी संगमनेर पॅटर्न ठरेल. त्यातून राज्यात नवी दुग्ध क्रांती होईल. यासाठी पंजाब चे सर्वतोपरी मदत असेल.

A workshop was held in Sangamner, organized by the Sangamner-based Rajhans Milk Union under the ‘Mission 50’ campaign, with the aim of boosting milk production. Former Revenue Minister Balasaheb Thorat, Rajhans Milk Union and Maharashtra Progressive Dairy Farmers Association President Ranjitsinh Deshmukh, Punjab Progressive Dairy Farmers Association President Daljit Singh Gill, Treasurer Rajpal Singh, Sukhdev Singh, Dr. Jayshree Thorat, and the Union’s Vice President Rajendra Chakor were among those present.


बाळासाहेब थोरात म्हणाले, १९७८ मध्ये पंजाबमधून गाई आणून दूध उत्पादन सुरू केले. दूध व्यवसायामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. रणजितसिंह देशमुख यांनी मुक्त संचार गोठा आणि मुरघास ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबविली. कोरोना संकट काळामध्ये त्यांच्या पुढाकारातून दररोज १० लाख लिटर दुधाची पावडर सरकारने बनवली त्यामुळे शेतकऱ्यांना एकही दिवस बंद न न घेता दूध पुरवठा सुरू ठेवता आला. मिशन ५० लिटर हा अत्यंत चांगला उपक्रम असून ही सर्वांनी मोहीम म्हणून राबवा. प्रास्ताविक उदय तिवारी यांनी, सूत्रसंचालन डॉ. कोमल मस्के यांनी करून डॉ. प्रमोद पावशे यांनी आभार मानले. कार्यशाळेत दीड हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

—————
मिशन ५० लिटर अंतर्गत ५० लिटर दूध देणाऱ्या गाई आपल्याला निर्माण करावयाचे आहेत. याकरता पंजाब मधून ११ महिन्याच्या कालवडी आणून त्यांच्यावर इम्पोर्टेड सॉर्टेड सीमेन वापर करणे हा एक पर्याय आणि दुसरे म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये पंजाब सारख्या इम्पोर्टेड सीमेनच्या गाई निर्माण करणे. तीन वर्षांमध्ये पहिली पिढी, पुढील दोन वर्षांमध्ये दुसरी पिढी, तर सात वर्षांत तिसरी पिढी या कालावधीने गाई निर्माण करणे शक्य आहे. राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम यशस्वी करणार आहोत.

  • रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, संगमनेर तालुका (राजहंस) दूध उत्पादक व प्रक्रिया संघ, संगमनेर

Related posts

Leave a Comment